नवादा : बिहार पोलिसांनी अरवल जिल्हा मुख्यालयाजवळील जनकपुरधाम येथील सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात नक्षलवादी हार्डकोर सदस्य, १५ मुली, चार संचालिका आणि ८ तरूणांना अटक केले आहे.
या भागात बऱ्याच काळापासून सेक्स रॅकेट सुरू होते. यात काही हाय प्रोफाईल व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अनेक व्हाइट कॉलर व्यक्ती यात सामिल असल्याने हा धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार यात हार्डकोर नक्षलवादी रामानंद पासवान यालाही अटक करण्यात आले. त्यामुळे सेक्स रॅकेटमध्ये माओवादींचाही हात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार नृत्य आणि संगिताच्या नावावर जनकपूर धाम भागात सेक्स रॅकेट चालविण्यात येत आहे. पोलिसांनी गुप्तचरांच्या सहाय्याने छापा टाकला. यात एकूण १५ मुली, एक नक्षलवादी आणि संचालिका आणि काही ग्राहकांना अटक केले. अटक करण्यात आलेल्या तरूणींना सुधारगृहात पाठविण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.