कसे पकडले काश्मिरी गावकऱ्यांनी अतिरेक्याला

 जम्मू काश्मिरीच्या गावकऱ्यांच्या धाडस आज साऱ्या भारताने पाहिलं. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोघा पैकी एका दहशतवाद्याला नागरिकांनी मोठ्या शिताफीने सिमरोळी भागात पकड़ले. 

Updated: Aug 5, 2015, 10:30 PM IST
कसे पकडले काश्मिरी गावकऱ्यांनी अतिरेक्याला title=

श्रीनगर :  जम्मू काश्मिरीच्या गावकऱ्यांच्या धाडस आज साऱ्या भारताने पाहिलं. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोघा पैकी एका दहशतवाद्याला नागरिकांनी मोठ्या शिताफीने सिमरोळी भागात पकड़ले. 

र नाट्यमय घटनेत गावकऱ्यांनी त्या तरूण दहशतवाद्यांवर ताबा मिळविला. नागरिकांनी पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद नावेद असून तो पाकिस्तानच्या फैसलाबाद येथील गुलाम मुस्तफाबाद भागातील रहिवासी आहे. त्याच्यासह नोमन उर्फ मोमीन हा दहशतवादी बीएसएफच्या गोळीबारात ठार झाला. बीएसएफच्या गोळीबारातून नावेद कसा तरी वाचला आणि जवळच्या डोंगराळ भागात जाऊन गावकऱ्यांना ओलिस धरले. 

एके ४७ घेऊन त्याने गावकऱ्यांना धमकावले, त्यांच्याकडून बंदुकीच्या जोरावर अन्न मागितल्याचे प्रत्यक्षदर्शीने पत्रकारांना सांगतिले. तो आपल्या साथीदाराबद्दलही अनेकवळा विचारत होता. 

गोळीबाराचा आवाज ऐकून मी घराबाहेर आलो. पाहतो तर काय हा दहशतवादी माझ्या समोर त्याने मला सोबत येण्यास धमकावले. त्याने यापूर्वी तीन-चार जणांना त्याने ओलिस धरले होते, असे ओलिस असलेल्या राकेश कुमारने सांगितले. 

त्यानंतर त्याने आम्हांला बंदूकीचा धाक दाखवून एका शाळेत नेले. त्याने या भागातून पळून जाण्यासाठी मार्ग विचारल्याचे दुसरा ओलिस असलेला विक्रमजीत सिंगने सांगितले. मार्ग सांगितला नाही तर त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्याची धमकी या दहशतवाद्याने दिली. 

दरम्यान, ओलिस ठेवलेले तिघे, देसराज, सुभाष शर्मा आणि जीवन पळून जाण्यात यशस्वी झाले. पण विक्रमजीत आणि राकेश यांनी दहशतवाद्याशी लढा दिला. त्याच्याकडची बंदुक हिसकावली आणि त्याला पकडले. 

मी त्याचे मान पकडली आणि राकेशने त्याची बंदुक पकडली. या झटापटीत दहशतवाद्याने गोळीबार केला. आम्ही थोडक्यात वाचलो. पण त्याला सोडले नाही आणि त्याची बंदुक हिसकावल्याचे विक्रमजीतने सांगितले. 

गावकऱ्यांनी पकडल्यावर दहशतवादी गयावया करायला लागला. मला माफ करा, मला पकडू नका. असे एका गावकऱ्याने सांगितले. 

त्यानंतर पोलिसांना गावकऱ्यांनी फोन केला. पोलिस आल्यावर या जिवंत दहशतवाद्याला ताब्यात घेतले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.