नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी बदल केले आहेत. आज १ ऑक्टोबरपासून पेट्रोलचे दर एका लीटरमागे ३६ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
तर डिझेल लीटरमागे ७ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोलच्या भावांत सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून, डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी करण्यात आले आहेत. मात्र, अत्यल्प अशीच आहे.
पेट्रोल दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल आणि त्याचा परिणाम भाजीपाल्यापासून ते दररोजच्या प्रवासावर दिसून येईल.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारीत किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. गेल्या दोन महिन्यात देशभरात चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती.