जम्मू : पाकिस्तानकडून सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला गोळीबारानेच उत्तर देण्यात येईल, अशी परखड भूमिका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर शहा गेले आहेत.
शहा यांनी आरएस पुरा सेक्टरमध्ये जनतेशी संवाद साधताना सांगितले की, भारत गोळीचे उत्तर गोळीने देणार आहे.
भाजप अध्यक्ष या भाषणात म्हणाले, की १९४७, १९६५ आणि १९७१ युद्धातील शरणार्थींच्या सर्व समस्या केंद्राकडून योग्यवेळी सोडविण्यात येतील.
भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर जम्मू काश्मीऱच्या दौऱ्यावर आलेल्या शहा यांनी रविवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत पक्षाच्या रणनितीवर चर्चा केली.
रविवारी जम्मू येथे पोहचलेल्या शहा यांचे भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जोरदार स्वागत केले. त्यामुळे शहरात सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकांतील ८७ पैकी ४४ जागांचे उद्दिष्ठ भाजपने ठेवले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.