कोलकाता : भारतीय नौदलाने जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारतात विकसित केलेले आहे.
आयएनएस कोलकता या लढाऊ जहाजावरून ही चाचणी करण्यात आली. भारतीय नौदलाने केलेल्या या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्रालयाने आनंद व्यक्त केला आहे.
क्षेपणास्त्राशिवाय या यंत्रणेत बहुआयामी टेहळणी करण्याची तसेच धोक्याची सूचना देणारे रडार आहे. क्षेपणास्त्राच्या स्थितीची माहिती ठेवणे आणि त्याला दिशा देण्याचं काम हे क्षेपणास्त्र करतं.
भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इस्राईल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ही चाचणी करण्यात आली आहे.