नवी दिल्ली : भारताने एका आठवड्यात त्यांच्या २ टॉप मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं आहे. मागच्या सोमवारी 5500 किलोमीटरपर्यंत मारा करणारं देशाच्या पहिल्या ICBM 'अग्नि-5'चं सशस्वी परीक्षण केलं गेलं. त्यानंतर आज सोमवारी दुसरी टॉप मिसाइल 'अग्नि-४'चं यशस्वी परीक्षण केलं गेलं.
ओडिशाच्या बालासोरमधील चांदीपूर इंटीग्रेटेड टेस्ट रेंज येथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी मोबाईल प्रक्षेपण यानच्या माध्यमातून परीक्षण केलं गेलं. अग्नि-५ भारताची पहली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे. अग्नि-४ ही ४००० किमीपर्यंत मारा करणारी न्यूक्लियर कॅपेबल मिसाईल आहे. २० मीटर लांबी आणि १७ टन वजनी मिसाईल १००० टन पर्यंत वॉरहेड घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. अग्नि-४ मिसाईल पूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे.