देशातील किलर स्पॉट शोधा, मुंडे निधनानंतर मागणी

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर धक्का व्यक्त करतानाच सरकारने किलर स्पॉट शोधावे आणि तसा नकाशा बनवावा, अशी मागणी जीनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 4, 2014, 05:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर धक्का व्यक्त करतानाच सरकारने किलर स्पॉट शोधावे आणि तसा नकाशा बनवावा, अशी मागणी जीनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर आयआरएफकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. अपघातप्रवण ठिकाणांचा शोध घेऊन त्याचा स्वतंत्रपणे नकाशा तयार करण्याची गरज आहे. दिल्ली वाहतूक पोलिस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाकडून संयुक्तपणे अशा धोकादायक ठिकाणांची माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे, असा सल्लाही आयआरएफने दिला आहे.
देशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंडे यांच्या निधनानंतर अपघाताच्या घटनांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगात दरवर्षी रस्ते अपघातात होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये एकट्या भारतातील १० टक्के नागरिकांचा समावेश आहे, असे आयआरएफचे अध्यक्ष के. के. कपिला यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.