पाटणा : बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या निवडणुकीत भाजपकडून उपस्थित मुद्द्यामुळे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. पाहू या काय आहेत भाजपच्या पराभवाची कारणे
१) सरसंघचालकाचे वक्तव्य भोवले
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात केलेले वक्तव्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. भागवत यांनी निवडणूक प्रचार दौऱ्या म्हटले होते की आरक्षणाची पुर्नसमिक्षा केली पाहिजे. पण दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी आरक्षणावर आपल्या सभांमध्ये बचावात्मक पवित्रा घेतला होता. पण भाजपचा डाव उलटा पडला.
२) बीफच्या मुद्दा भोवला
- बीफच्या मुद्द्यावर मतदारांनी नाकारले. मतदारांचे ध्रुवीकरण झाले नाही. दादरीमध्ये गोमांसावरून एका मुस्लिमाची हत्या झाल्याचा परिणामही बिहार निवडणुकीवर झाला. आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी याप्रकरणी भाजपवर जोरदार टीका केली.
३) मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही
- भाजपने बिहारमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. भाजपच्या या खेळीला नितीशने आपला निवडणुकीचा मुद्दा बनवला. बिहारी विरूद्ध बाहरी असा नारा देऊन निवडणूक लढवली.
६) महंगाई डायन
- महागाईने या निवडणुकीवर खूप मोठा परिणाम केला आहे. डाळीच्या किंमती वाढल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. महागड्या डाळीने भाजपच्या समर्थनात असलेल्या मतदारांना विचार करायला लावला. बिहारमध्ये राज्यातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरिबी रेषेच्या खाली आहे.
७) स्थानिक नेत्यांना दूर लोटले
- भाजपच्या स्थानिक नेत्यांना प्रचारातून बाहेर ठेवण्यात आले. बिहारचे स्थानिक मुद्दे आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांची अवहेलना करण्यात आली. शत्रुध्न सिन्हा आणि वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. शुत्रध्न सिन्हा आणि आर. के. सिंह यांनी सार्वजनिकपणे आपली नाराजी व्यक्त केली.
८) नितीश कुमारांची स्वच्छ प्रतिमा
-नितीश कुमार यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा नव्हता. जनतेने नितिशवर भरोसा दाखवत पुन्हा विजयश्री मिळवून दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.