सकाळी 12.10 वाजता
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन... फोनवरून दिल्या शुभेच्छा
Just received a phone call from the Prime Minister congratulating me. Thank you Modi ji- Bihar CM Nitish Kumar
— ANI (@ANI_news) November 8, 2015
सकाळी 12.00 वाजता
बिहारमधील जनतेने जो कौल दिला आहे ते तेथील जनतेचाच विजय आहे... केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक लढवू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हा पराभव - शरद यादव, अध्यक्ष, जनता दल युनायटेड
सकाळी 11.20 वाजता
- मोठ्या पदावर बसलेल्यांची भाषा विनम्रतेची असायला हवी... - सेनेच्या राऊतांचा भाजपला आणि मोदींना टोला
- आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचंच चित्र इथंही पाहायला मिळेल - संजय राऊत
सकाळी 10.35 वाजता
- महागठबंधन आघाडीवर... काँग्रेसनं दिल्लीत फोडले फटाके... महागठबंधनात सामाविष्ट असलेलं काँग्रेस सेलिब्रेट करतंय भाजपचा पराभव
सकाळी 10.30 वाजता
- अजरुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली लढणारे एमआयएमचे सगळे उमेदवार तोंडावर
सकाळी 10.25 वाजता
- लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही मुलं आघाडीवर
सकाळी 10.20 वाजता
- आम्हाला हे अगोदरपासूनच माहीत होतं... हा भाजप आणि मोदींचा पराभव आहे - पवन वर्मा, जेडीयू
सकाळी 10.15 वाजता
- हे तर काहीच नाही... आम्ही 140 पेक्षा जास्त जागा मिळवू - मिसा भारती, (लालूंची मुलगी) आरजेडी
सकाळी 10.10 वाजता
- एनडीएच जिंकणार, आमचंच सरकार बनणार - भाजप नेते गिरीराज सिंग
सकाळी 10.05 वाजता
- निवडणूक आयोगाच्या आकड्यांनुसार, पाचव्या फेरीनंतर महाआघाडीची 135 जागांवर आघाडी, एनडीए - 90 तर इतर 7 जागांवर आघाडीवर
सकाळी 10.00 वाजता
- शेवटच्या टप्प्यातील मतमोजणी सुरू, निकाल अधिक स्पष्ट होणार
सकाळी 9.50 वाजता
- बिहारमध्ये महागठबंधन सर्वात पुढे - ईटीव्ही
- जेडीयू बिहारमध्ये आघाडीवर - टाईम्स ऑफ इंडिया
सकाळी 9.40 वाजता
- निवडणूक आयोगाचे आकडे - महागठबंधन (नितिश) ११९, एनडीए (मोदी) ७६, इतर ९
- निवडणूक आयोगाच्या आकड्यांमध्ये नितिश आघाडीवर
- महागठबंधनमध्ये नितिश यांच्यापेक्षा लालूंचा पक्ष आघाडीवर
सकाळी 9.25 वाजता
- भाजप आघाडीवर... कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उत्सुकता शिगेला... भाजप कार्यकर्त्यांचं पाटण्याच्या भाजप कार्यालयात सेलिब्रेशन
- भाजपच्या कार्यालयात जिलेबी तळायला सुरूवात
सकाळी 8.45 वाजता
- भाजप - 50, जेडीयू 27 जागांवर आघाडीवर
सकाळी 8.40 वाजता
- लालूंचा मुलगा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूरमधून आघाडीवर
सकाळी 8.20 वाजता
- लालूप्रसाद यादव यांचे समर्थक, कार्यकर्ते मिठाई घेऊन त्यांच्या पाटण्याच्या घरी दाखल
सकाळी 8 वाजता
- मतमोजणीला सुरुवात
पाटणा : बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे.
राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होतील. 39 मतमोजणी केंद्रावर सर्व 243 विधानसभा क्षेत्रांची मतमोजणी होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 3450 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, यामध्ये केवळ 272 महिलांचा समावेश आहे.
बिहारमध्ये पाच टप्प्यात मतदान झालंय. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. नव्या भिडूंना सोबत घेत भाजपप्रणित एनडीएनं निवडणुकीत आपली टीम मजबूत केली.
तर त्यांच्या विरोधात काँग्रेसला कवटाळत, नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादवांची महाआघाडी दंड थोपटून रिंगणात उतरली. नरेंद्र मोदी नावाचं वादळ रोखण्यासाठी महाआघाडीचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होणार का? ब्रँड मोदी विरूद्ध ब्रँड नीतीशकुमार ही लढाई कोण जिंकणार? लोकसभा आणि गेल्यावेळच्या विधानभेच्या तुलनेत यंदा वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाला फायदेशीर ठरणार? कोण बनणार बिहारचा बाहुबली याचा फैसला आज होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.