नवी दिल्ली : देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे.
तसेच १४ एप्रिल २०१७ ला ३ मेगा ड्रॉ असणार आहेत. त्यात तीन वेगवेगळ्या विजेत्यांना १ कोटी, ५० लाख आणि २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
Govt has initiated numerous steps to combat scourge of corruption and black money in last two and a half years: Amitabh Kant,NITI Aayog CEO pic.twitter.com/JoK4DrsMWF
— ANI (@ANI_news) December 15, 2016
नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी या योजनेची घोषणा केली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) पुढील १०० दिवसांसाठी १५ हजार ग्राहकांना १००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याची सुरूवात क्रिसमसपासून म्हणजे २५ डिसेंबर पासून होणार आहे.
NPCI to announce 15,000 winners of 1000 rupees each for next 100 days,starting from Christmas:Amitabh Kant,NITI Aayog #LuckyGrahakYojana
— ANI (@ANI_news) December 15, 2016
या शिवाय व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापारी योजनाचे घोषणा केल आहे. या माध्यमातून डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी दर आठवड्याला ७ हजार व्यापाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रत्येक व्यापाऱ्याला जास्ती जास्त ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.
All Govt departments are now moving towards digital payments: Amitabh Kant,NITI Aayog CEO
— ANI (@ANI_news) December 15, 2016