पर्रिकरांनंतर आर्लेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर उद्या म्हणजेच शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर गोव्याची सूत्रं कुणाच्या हातात जातील? खलबतं सुरू आहेत.

Updated: Nov 7, 2014, 05:26 PM IST
पर्रिकरांनंतर आर्लेकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री?  title=

पणजी : गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रीकर उद्या म्हणजेच शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर गोव्याची सूत्रं कुणाच्या हातात जातील? खलबतं सुरू आहेत.

पर्रिकर त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळतंय. त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पर्रीकर सोमवारी उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल करतील तर उद्या गोव्यात भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. येडीयुरप्पा आणि राजीव प्रताप रुडी निरीक्षक म्हणून जाणार आहेत. 

दरम्यान, नव्या नेता निवडीचे सर्वाधिकार हे केंद्रीय संसदीय मंडळाला देण्यात आलेत. विधानसभा सभापती राजेंद्र आर्लेकर यांचं नाव यासाठी आघाडीवर असल्याचं मानलं जातंय. त्यांनी स्वतः या बातमीला दुजोरा दिलाय. 

कोण आहेत आर्लेकर? 
* राजेंद्र आर्लेकर गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत
* तसंच ते गोव्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत
* आर्लेकर यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जवळीक आहे
* राजेंद्र आर्लेकर पेडणेचे विद्यमान आमदार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.