रायपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या नक्षलवादी क्षेत्र दंतेवाडा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सामाजिक आणि आर्थिक विकासाचा आढावा घेण्यासाठी ते तेथे गेले आहेत. पंतप्रधान यांच्या दौऱ्यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवळपास ५०० जणांना बंधक बनवलं आहे.
मोदी यांचा दौरा सुरू असतांना नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा येथील मरेंगा गावातील ५०० लोकांना बंधक बनवलं आहे. मरेंगा गाव दंतेवाडापासून ७० किमी अंतरावर आहे. हे लोक मोदी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी जात होते.
याबाबतची माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी पुलाची निर्मिती करणाऱ्या काही कामगारांनाही बंधक बनवलं आहे. जवळपास ३०० ग्रामस्त बंधकांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांशी बोलणी करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.