www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात दंगली प्रकरणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मत मांडलं आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे, आपण कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.
राष्ट्रवादीने नरेंद्र मोदी यांच्याविषयी नरमाईची भूमिका घेतल्याने, याविषयी अनेक तर्क राजकीय वर्तुळात काढले जात आहेत. यावर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरेजवाला यांनी म्हटलं आहे की, प्रफुल्ल पटेल यांचे हे वैयक्तिक मत आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांन काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातमधील दंगल भडकवण्यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, तर काँग्रेसने शिख विरोधी दंगल थांबवण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं होतं.
काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलींसाठी दोषी मानलं आहे. मात्र एसआयटीने नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगली प्रकरणी क्लिनचीट दिली आहे.
काँग्रेससाठी राष्ट्रवादीचे हे मत एक मोठा झटका असू शकतो, कारण जम्मू काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये सुरू असलेल्या मोठ्या वादामुळे, मुख्यमंत्री ओमर अब्दुला हे राजीनामा देऊ शकतात, मतभेदाचं कारण उमर अब्दुल्ला यांच्या महत्वाकांक्षी योजनेत काँग्रेसने आडकाठी आणली असल्याचं सांगितलं जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.