www.24taas.com,कोलकाता
दिल्लीचा फैसला आज कोलकात्यात होणारय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची संध्याकाळी कोलकात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचा पाठिंबा काढायचा की सरकारसोबत रहायचं याचा निर्णय ममता बॅनर्जी घेणार आहेत.
इंधन दरवाढ आणि एफडीआयवरून ममता बॅनर्जी सरकारवर नाराज आहेत. निर्णय मागे घेण्यासाठी त्यांनी सरकारला ७२ तासांची मुदत दिली होती. ही मुदत आज संपलीय. त्यामुळे ममता बॅनर्जी आता कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलय. दुसरीकडे ममतांची समजूत घालण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारनं व्यक्त केलाय.
डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी नाराज आहेत. पण दुसरीकडे काँग्रेस मात्र ममता बॅनर्जींची मन वळवण्यात यशस्वी होऊ असा आत्मविश्वास बाळगून आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन तरी काँग्रेसला ममता बॅनर्जींची फारशी चिंता नाही, असंच दिसतंय. पण तरीही सगळ्यांचं लक्ष ममता बॅनर्जींकडे लागलंय.
ममता बॅनर्जींनी सरकारला दिलेला अल्टिमेटम लक्षात घेता ममता बॅनर्जी मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तो निर्णय कुठला असेल, हाच मोठा प्रश्न आहे.