नवी दिल्ली : एक एप्रिलपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकांना दिलेत. 1 एप्रिलपर्यंत शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावं असं आरबीआयने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
सर्व सरकारी बँका आणि काही खासगी बँकांना हे निर्देश देण्यात आलेत. 31 मार्चला 2016-17 हे आर्थिक वर्ष संपणार असून एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे.
त्यामुळे करभरणा आणि सर्व आर्थिक व्यवहार सुलभ व्हावे या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतलाय. आरबीआयची काही निवडक कार्यालयंसुद्धा 1 एप्रिलपर्यंत दररोज सुरु राहणार आहेत.