नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
संसद अधिवेशनाच्या सातव्या दिवशी चर्चेला अखेर सुरुवात झाली आणि कोंडी फुटली. नोटाबंदीच्या मुद्द्यावरील चर्चेला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापासून सुरूवात झाली. नोटाबंदीच्या निर्णयाला कुणाचाच विरोध नसल्याचं सांगत त्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याची टीका मनमोहन सिंहांनी केली. खात्यात पैसे भरण्याची मर्यादा नसणं, मात्र पैसे काढण्यावर मर्यादा असणं हा प्रकार केवळ आणि केवळ भारतातच सुरू असल्याचं मनमोहन म्हणाले.
राज्यसभेमध्ये नोटाबंदीवर चर्चा करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या तडकाफडकी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. सरकारने ५० दिवसांचा वेळ मागितला असला तरी हा कालावधी गरिबांना परवडणार नाही. नोटाबंदीबाबत देशात दुमत असू शकत नाही, मात्र जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्याने सर्वसामान्यांना जास्त त्रास होत आहे, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी काय उपययोजना केल्या आहेत याची माहिती पंतप्रधानांनी द्यावी, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी केली.
PM said wait for 50 days but for the poor section even 50 days can be detrimental: Former PM Manmohan Singh in RS #DeMonetisation pic.twitter.com/YQFeioDwFf
— ANI (@ANI_news) November 24, 2016
Important to take note of the grievances of the people suffering: Former PM Manmohan Singh #DeMonetisation pic.twitter.com/RfE301KBJ6
— ANI (@ANI_news) November 24, 2016
या निर्णयामुळं छोटे उद्योजक आणि शेतक-यांचे हाल होत असल्याचंही मनमोहन म्हणाले. तर मोदींनी स्तुतीपाठकांपासून सावध राहावं, असा सल्ला देत समाजवादी पक्षाचे नरेश अग्रवाल यांनी भाजपला चिमटे काढले.
या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित आहेत. त्यामुळं सहा दिवसांच्या गोंधळानंतर अखेर निर्णयाला सुरुवात झालीय. लोकसभेत मात्र सातव्या दिवशीही गोंधळ सुरूच राहिला. लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर कागद फाडून फेकल्यामुळं गोंधळाचं वातावरण तयार झालं. त्यामुळं लोकसभेचं कामकाज अगोदर बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
12:26 PM
नवी दिल्ली : स्तुती सर्वांना आवडते, आणीबाणी लागू झाल्यानंतर इंदिरा गांधींनाही समर्थनार्थ पत्र आली होती पण निकाल काय आला होता ते सर्वांनी पाहिले आहे - नरेश अग्रवाल
12:26 PM
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केली आहे - नरेश अग्रवाल
12:26 PM
नवी दिल्ली : भाजपला चांगले दिवस हे मोदींमुळे आले आहेत. असा एक नेता स्वत:च्या हिमतीवर पक्षाला सत्तेत आणले आहे. - नरेश अग्रवाल
12:26 PM
नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय देशाच्या हिताचा नसून उत्तरप्रदेश निवडणुका लक्षात घेऊन घेतला गेला - नरेश अग्रवाल
12:15 PM
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. केवळ भाजपचे नाहीत - राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद
12:14 PM
नवी दिल्ली : लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी काय उपययोजना केल्या आहेत याची माहिती पंतप्रधानांनी द्यावी - मनमोहन सिंग
12:13 PM
नवी दिल्ली : नोटाबंदीबाबत देशात दुमत असू शकत नाही, मात्र जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत त्याने सर्वसामान्यांना जास्त त्रास होत आहे - मनमोहन सिंग
12:12 PM
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बॅंकेतून पैसे काढण्यावर बंदी ही छोट्या उद्योगांना मारक, भारत सोडून असा देश दाखवा पैसै काढण्यावर बंदी असणारा - मनमोहन सिंग
12:10 PM
नवी दिल्ली : 50 दिवसांची वाट पाहाणे, हे गरिबांसाठी कठिण दिवस - मनमोहन सिंग
12:09 PM
नवी दिल्ली : नोटाबंदीला काँग्रेसचा विरोध नाही - खासदार आनंद शर्मा
12:08 PM
नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन राज्यसभेत चर्चा सुरु, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली चर्चेला सुरुवात