नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवैसी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एका पाऊलामुळे खूप खुश आहेत.
देशात पहिली इस्लामिक बँक सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे ओवैसी खूश आहे. ओवैसीने ट्विट करून सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे. हा केवळ मुस्लमांनासाठी चांगले पाऊल नाही तर यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढणार आहेत. खराब कर्जाची प्रक्रियेतून सर्वांना मुक्ती मिळेल.
Good step it's not for Muslims only will boost Infrastructure projects & help get rid of vicious debt cycle https://t.co/Ok5zEyDFya
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 30, 2016
जेद्दाहच्या इस्लामिक डेव्हलपमेंट बँक (आयडीबी) भारतातील गुजरातममध्ये पहिली शाखा सुरू करत आहेत. ही देशातील पहिली इस्लामिक बँक असणार आहे. या बँकेचे ५६ इस्लामिक देश सदस्य आहे. गुजरातच्या सोशल सेक्टरमध्ये काम करताना ३० मेडिकल वॅन देणार आहे.
'द टाइम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार बँक शरिया कायद्यानुसार काम करत आहे. बँकेचा उद्देश सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सामाजिक विकासासाठी काम करणे हा आहे.
गेल्या एप्रिलमध्ये यूएई दौऱ्यात एक्सिम बँक आणि आयडीबी बँकेच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली.