01:48PM- पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी होणार गृहमंत्रालयाची बैठक. गृहसचिव, आयबी प्रमुख आणि बीएसएफचे प्रतिनिधीही बैठकीस उपस्थित राहणार.
10:56AM - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडून पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी - रशीद अल्वी, काँग्रेस नेते
10:49AM - पाकिस्तान आता आतंकीस्तान झाले आहे, पण आपले सैन्यही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे - मुख्तार अब्बास नकवी
10:20AM - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दिल्लीत सैन्याच्या तिन्ही प्रमुखांसोबत बैठक घेणार, सूत्रांनी दिली माहिती.
10:08AM - कांचीपूर येथे सीआयएसएफच्या जवानाने तिघा सहकाऱ्यांची गोळी झाडून केली हत्या, तर अन्य दोघे जवान गंभीर जखमी
श्रीनगर: सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ भारतीय नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याला चर्चा बंद करुन पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे केंद्र सरकारनं निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील ५० भारतीय चौक्या आणि १८ गावांवर पाकिस्तानी रेंजर्सनं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोरदार गोळीबार केला. बुधवारी सकाळपर्यंत हा गोळीबार सुरुच होता. भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पाक रेंजर्सच्या गोळीबारात २ जवानांसह ११ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्यानंही पाक रेंजर्सला चोख प्रत्युत्तर दिलंय.
१ ऑक्टोबरपासून सीमा रेषेवर पाकनं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. भारत - पाकमधील तणावामुळं सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणाऱ्या १६ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर भारतानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानमधील १५ जण ठार झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.