www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.
रामविलास पासवान यांनी राज्यसभेत मराठवाडा आणि विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली, तेव्हा एकही मराठी खासदाराने रामविलास पासवान यांचा विरोध केला नाही.
बहुतेक गोंधळात खासदारांपर्यंत रामविलास पासवान काय बोलतायत हे पोहोचलं नसल्याचं सांगण्यात येतय. यापूर्वी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली होती.
विदर्भ आणि मराठवाड्याचा महाराष्ट्र सरकारकडून विकास होत नाही, या भागाकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने मराठवाडा आणि विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी रामविलास पासवान यांनी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.