नवी दिल्ली : नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यताय. कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची किंमत ३३.३६ डॉलर प्रति बॅरलवर पोहचलाय. पंधरा दिवसापूर्वी हाच भाव ३९.०२ डॉलर प्रति बॅरल होता.
पंधरवड्यापूर्वीच कच्च्या तेलानं आंततराष्ट्रीय बाजारात अकरा वर्षातला नीचांक गाठला. त्यानंतर भाव काहीसे सुधारले. पण सध्या युरोप आणि अमेरिकेत सुटीचा सिझन आहे. त्यामुळे कच्च्या तेल्याचा भाव सातत्यानं खाली येतेय. त्याच परिणाम म्हणून भारतीय तेल वितरण कंपन्यांना प्रतिबॅरल ५ डॉलरचा फायदा होतोय.
भारतीय रुपयात हा फायदा जवळपास ४०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे आता हा फायदा तेल वितरण कंपन्या ग्राहकांपर्यंत कसा पोहचवतात. यावर पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त होईल हे ठरेल.