नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुक्रवारी सायंकाळी चहासाठी आमंत्रित केलंय.
राज्यसभेत रखडलेल्या जीएसटी विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत 'चाय पे चर्चा'चा कार्यक्रम आखलाय.
या आमंत्रणाला काय उत्तर द्यायचं याबाबत काँग्रेसमध्ये मात्र विचारमंथन सुरू आहे. यासाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलाम नबी आझाद यांची एक बैठकही सुरू आहे.
मोदींनी या दोघांना चहासाठी बोलावलं आणि संसदेतली कोंडी फोडण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू केलाय. एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करायचं असेल, तर याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होणं सरकारसाठी आवश्यक झालंय. जीएसटीला काँग्रेसचीही तत्वतः मान्यता आहे. केवळ विधेयकातल्या काही कलमांबाबत मतभेद आहेत. ते दूर करण्यासाठी मोदींनी हात पुढे केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.