नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुम्हाला नक्की आनंद होईल. पंतप्रधान कार्यालयानुसार पीएम मोदी प्रत्येक वेळी ऑनड्युटी असतात. त्यांनी अजून एकही सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने हे देखील म्हटलं की, पंतप्रधानांनी या दिवशी सुट्टी घेतली अशी कोणतीच माहिती अजून त्यांच्याकडे नाही. पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालय यांच्याकडून मागवलेल्या एका आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
आरटीआय फाईल करणाऱ्या या व्यक्तीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, अटल बिहारी वाजपेयी, एच डी देवगौडा, इंद्र कुमार गुजराल, पीव्ही नरसिंह राव, चंद्रशेखर, वीपी सिंह आणि राजीव गांधी यांनी घेतलेल्या सुट्टींची देखील माहिती मागवली होती.
२६ मे २०१४ ला मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्या दिवसापासून ते १८ तास काम करत आहेत. पंतप्रधान मोदी हे फक्त ५ तास झोपतात. सकाळी ५ वाजता ते उठतात आणि योगा करतात. पंतप्रधान भारताच्या हितासाठी विदेश दौरे करतात. अनेकदा असंही झालं आहे की, नवरात्री उपवासादरम्यान ही त्यांनी विदेशात दौरे केले आहेत. अशा वेळेस त्यांनी फक्त पाणी पिऊन काम केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कामाला सलाम.