भूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!

 भूमी अधिग्रहण विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेससह सामाजीक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. शिवसेनेचाही या विधेयकाला विरोध आहे. त्यामुळे अखेर सरकारला आक्रमकरित्या या विधेयकाची पाठराखण करावी लागली. 

Updated: Feb 27, 2015, 08:26 PM IST
भूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी! title=

नवी दिल्ली  :  भूमी अधिग्रहण विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेससह सामाजीक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. शिवसेनेचाही या विधेयकाला विरोध आहे. त्यामुळे अखेर सरकारला आक्रमकरित्या या विधेयकाची पाठराखण करावी लागली. 

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर मुंबईत नितीन गडकरींना भूमीअधिग्रहण विधेयकाची पाठराखण करण्यासाठी बॅटींग करावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित करत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. 

भूमी अधिग्रहण विधेयकाला काँग्रेस विरोध करत असलं तरी त्यांनी केलेल्या भूसंपादनाच्या कायद्यामुळंच त्यांचा पराभव झाल्याचा टोला मोदींनी लगावला. 

विधेयकात बदल करण्याची तयारी...
मात्र, सध्याचं भूमी अधिग्रहण विधेयक शेतकरी विरोधी असेल आणि विरोधकांचा विरोध असेल तर आपण य़ा विधेयकात बदल करण्यास तयार असल्याची ग्वाही मोदींनी लोकसभेत दिली. 

'राज्यघटना हाच धर्मग्रंथ'
तसंच, 'इंडिया फर्स्ट' हा सरकारचा पहिला धर्म असून राज्यघटना हाच सरकारचा धर्मग्रंथ असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलंय.

मोदी सरकार उद्योगधार्जिणं - अण्णा 
केंद्रातलं सरकार उद्योगपतीधार्जिणं असल्याचा आरोप ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलाय. सरकार हुकूमशाही पद्धतीने चाललं असल्याची टीका अण्णांनी केलीय. 

सरकारने अध्यादेश काढल्याप्रमाणेच कायदा केलाय. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांची जमीन घेत असला तर त्याचा योग्य मोबदला दिला पाहीजे असं अण्णा म्हणाले.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.