रेपवर मोदींनी नेत्यांना फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज पहिले भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विकासाला जनआंदोलन करण्याचे सूतोवाच केले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 11, 2014, 09:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज पहिले भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विकासाला जनआंदोलन करण्याचे सूतोवाच केले.
पाहू कोण कोणत्या मुद्यांवर मोदी या काय बोलले
नेत्यांनी रेपचे विश्लेषण बंद करा
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात महिलांना कोणताही निर्णय घेण्यात भागीदार बनविण्याखेरीज त्यांचा सम्मान आणि सुरक्षेबाबत चिंतेवर अधिक जोर दिला. नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आपली तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, `मी देशातील नेत्यांना अपील करतो की, रेपच्या घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे बंद करा. आपण आई-बहिणींच्या आत्मसम्मानांशी खेळ का करत आहोत. आपण गप्प बसू शकत नाही का? महिलांचा सम्मान आणि सुरक्षा सर्व देशाची प्राथमिकता झाली पाहिजे.
सरकार गरीबांसाठी असले पाहिजे
पंतप्रधानांनी सांगितले की, आपण गरिबांसाठी सरकार चालविले नाही तर देशाची जनता आपल्या माफ करणार नाही. त्यांनी सांगितले, ` सरकार फक्त साक्षर लोकांची असते का. सरकार फक्त काही निवडक लोकांची असते का, सरकार गरीबांसाठी असली पाहिजे. श्रीमंताचा मुलगा मोठ्या शाळेत शिकू शकतो, त्यावर उपचार होऊ शकतो. मग गरीब कुठे जाणार? गरीबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षण दिले पाहिजे.
गावातील जीवन बदलण्याला प्राथमिकता
पंतप्रधानांनी सांगितले की, जर गावातील जीवन आपण बदलले तर कोणालाही आपले गाव सोडावेसे वाटत नाही. त्यांनी सांगितले की, `आपण अनेक वर्षांपासून म्हणतो की आपला देश कृषि प्रधान आणि गावांचा देश आहे. ही घोषणा चांगली वाटते. पण आपण गावांमधील जीवन बदलू शकलो आहे? आपण याला प्राथमिकता दिली आहे.
गावात उद्योगांचे जाळे का नाही?
मोदींनी देशवासियांचे आभार मानताना म्हटले की, अनके वर्षांनंतर देशात स्थिर शासन आणि विकासासाठी मत देऊन पाच वर्षांसाठी विकासाची यात्रा निश्चित केली आहे. गरीब आणि गांवांच्या विकासावर जोर देतांना पीएम म्हणाले, ` गावात आपण उद्योगांचे जाळे निर्माण करू शकत नाही? आपण संपूर्ण ईशान्य भारताला ऑर्गेनिक स्टेट म्हणून विकसीत करू शकत नाही का? ` याखेरीज त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जमिनीचे हेल्थ कार्डाचीही शिफारस केली.
सर्व आश्वासनं पूर्ण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांच्या शंकाना फेटाळत सांगितले की, माझे सरकार सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे. `मी नवीन नवीन गुजरातचा सीएम झालो होतो. तेव्हा मी विधानभवनात सर्व गांवांना २४ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेस नेत्यांना विश्वास बसत नव्हता. त्यांनी मला विचारले तुम्ही असे करू शकणार का? मला आनंद वाटतो की, ते काम झाले आहे. आता या ठिकाणीही आम्ही ते काम करणार आहोत.
मुलायमांचा सल्ला घेण्यास मोदी तयार
मोदींनी म्हटले की, 'मुलायम सिंह यांनी सांगितले की, आम्ही सरकार चालवले आहे. त्यांनी सांगितले की, तुम्ही इतके काम पूर्ण करणार का? त्यावर मी म्हणेन आपल्याला प्रयत्न तर करायला हवा. आम्हांला अडचण आली तर आम्ही मुलायम सिंहांचा सल्ला घेणार असे म्हणत मोदींनी मुलायम सिंह यांना टोला लगावला. पीएम म्हणाले, की आम्ही अशी शक्ती संपादित करू, ज्याने आम्हांला अहंकार येणार नाही आणि ती आम्हांला नम्रता शिकवेल. या ठिकाणी आमची कितीही संख्या असली तरी आम्हांला तुम्हांला सोडून पुढे जायचे नाही.
राज्यांकडून शिकून पुढे जावे लागेल
मोदी म्हणाले, 'गुजरात मॉडेलवर खूप चर्चा होते. गुजरातचे मॉडेल हे त्याच्या प्रत्येक जिल्ह्यात चालत नाही. वाळवंटातील कच्छ आणि हिरव्यागार बलसाड़च्या विकासाचे मॉडेल वेग-वेगळे आहे. गुजरातचे दूसरे मॉडल असे आहे की, ज्या ठिकाणी चांगले ते दुसऱ्या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रत्येक राज्यातून काही ना काही शिकले पाहिजे. राज्याशी आम्ही मोठ्या भावाप्रमाणे वागणार नाही.
जनतेच्या अपेक्षांचे आपण दूत
मोदींनी सांगितले की, 'मतदान होईपर्यंत आपण उमेदवार होतो, आता जनतेच्या उमेदीचे दूत आहोत. कोणाचेही दायित्व दूताप्रमाणे जनतेच्या आशा आकांशांना पूर्ण करणे असते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आवाज उठविला पाहिजे.
गर्वाने मान उंच करून जगाला दाखवून देऊ
नरेंद्र मोदींनी सांगितले, की या निवडणुकांनंतर के