नवी दिल्ली : नवी दिल्ली विधानसभा जागेवरून नामांकन दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय.
यानुसार, अरविंद केजरीवाल यांच्याकडे सध्या 2.26 लाख रुपये रोख आहेत. तर त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत आहे 1.92 करोड रुपये... ही रक्कम गेल्या वर्षाच्यामानाने दोन लाख रुपये कमी आहे. याशिवाय, केजरीवाल यांच्याविरुद्ध एकूण 10 प्रकरणं न्यायालयात सुरू आहे.
यापूर्वी, केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदीवर स्वतंत्रता सेनानींचं भगवाकरण करण्याचा आरोप केलाय. बेदी यांनी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेवर भगव्या रंगाचा कपडा चढवला होता.. त्यावर, 'किरणजी स्वतंत्रता सेनानींना तरी सोडा' असा टोला केजरीवाल यांनी किरण बेदींना लगावलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.