नवी दिल्ली : रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं. भारतीय रेल्वे अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, हे सांगताना रेल्वेच्या ७०० नविन लाईन टाकण्याचा दृष्टीकोण असून आधी प्रलंबित ३५९ प्रकल्प पूर्ण करणार आहोत, असे गौडा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प गौडा यांना आज मांडला. ते म्हणालेत, रेल्वेच्या प्रत्येक समस्येचे समाधान केले जाईल. रेल्वेच्या प्रत्येक समस्येवर उपाय केला जाईल. भारतीय रेल्वे ही अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. जगातील मोठी मालवाहतूक व्यवस्था रेल्वेमार्फत केली जात आहे. देशाच्या वाहतुकीमध्ये ३१ टक्के वाटा हा रेल्वेचा आहे. रेल्वे राज्याराज्यांतील अंतर कमी करत आहे.
रेल्वेतून २ कोटी ३० लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. चुकीच्या गुंतवणुकीमुळे रेल्वेला तोटा सहन करावा लागला आहे. योग्यवेळी भाडेवाड न केल्याने रेल्वे तोट्यात आहे. ७००नवीन लाईन टाकण्याचा प्रस्ताव आहे.
रेल्वेचे आधी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार आहोत. ३५९ प्रकल्प प्रलंबित आहेत. पर्यायी उत्पन्नासाठी FDIचा उपयोग करणार आहे. तशी मागणी करणार आहे.
रेल्वेच्या विकासासाठी ११ हजार ८०० कोटी उधार घेणार आहे. रेल्वेची कमाई १ रुपया असून खर्च ९४ पैसे आहे. दुपरीकरण, तिहेरीकरण न संपणारी गोष्ट आहे. मेट्रो शहरात हायस्पीड रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. पीपीपी मॉडेलचा प्रस्ताव आहे. रेल्वेत दर्जेदार खाद्यपदार्थ पुरविण्यावर भर असणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी रेल्वे विद्यापीठाचे स्थापना करण्यात येणार आहे. महिला बोगींमध्ये महिरा सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला देशात लवकरच मान्यता देण्यात येईल. तो सुरु करण्यासाठी प्राधान्य असेल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे.
तिकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. तर ए दर्जाच्या स्टेशनवर वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नव्याने रेल्वे सुरु करणार
गदग-पंढरपूर रेल्वे
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन
गोवा- मुंबई हायस्पीड ट्रेन
नागपूर - सिकंदराबाद हायस्पीड ट्रेन
नवे रेल्वेमार्गाचं सर्वैक्षण
औरंगाबाद - चाळीसगाव
सोलापूर-तुळजापूर
कसारा-इगतपुरी चौथी लाईन
नव्याने फेऱ्या
नव्या २७ एक्सप्रेस गाड्यांची घोषणा, ५ प्रिमीयम एक्सप्रेस गाड्या, ५ जनसाधार गाड्या सुरु करणार
नागपूर-पुणे साप्ताहिक
निझामुद्दीन -पुणे साप्ताहिक
नवी दिल्ली - पुणे प्रिमीयम एक्सप्रेस
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.