www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एखादी मोठी गुंतवणूक केली तर मोठा फायदा... जॅकपॉट... अशा आशयाचे ई-मेल सध्या लोकांना पाठवले जात आहेत आणि के ही रिझर्व्ह बँकेच्या नावानं... मात्र सावधान हे ई-मेल रिझर्व्ह बँकेनं पाठवले नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
रिझर्व्ह बँक आणि बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावानं ही आमिषं दाखवणारे बनावट ई-मेल पाठवण्यात येत असल्यानं त्यापासून लोकांनी सावध राहावं, अशी सूचना रिझर्व्ह बँकेतर्फे करण्यात आली आहे. याआधीही बँकेचे माजी गव्हर्नर सुब्बाराव यांच्या नावानं बनावट मेल पाठवल्याचं उघड झालं होतं. बँक खातेदाराला १ कोटी २० लाख डॉलर्स रिझर्व्ह बँकेतर्फे दिले जात असल्याचा खोटा मेल पाठवण्यात आला होता. त्यामुळं आताही अशाप्रकारच्या मेलपासून सावध राहाण्याचं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलंय.
Reserve Bank of India <no-reply@rbi.com> या ई-मेल आयडीनं मेल पाठवले गेले होते. चोरी-फसवाफसवी होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक सिक्युरिटी प्रोटेक्शन सॉफ्टवेअर देत असल्याचा हा बनावट मेल होता. वास्तविक rbi.com हे एक्सटेंशन असलेला कोणताच ई मेल आयडी रिझर्व्ह बँकेनं बनवलेला नाही. तसंच, कुठलंही सॉफ्टवेअर बँकेनं तयार केलेलं नाही, असे मेल लोकांनी ओपन करून नयेत, अशी सूचना बँकेनं केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.