सासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी

ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय.  

Updated: Jul 6, 2015, 06:41 PM IST
सासरच्या जाचाला कंटाळून अनामिकानं केली आत्महत्या - आयजी title=

भोपाळ: ट्रेनी सब इन्स्पेक्टर अनामिका कुशवाहच्या आत्महत्येनं खळबळ माजलीय. व्यापमं घोटाळ्यातील सलग तिसरा मृत्यू असल्याचं बोललं जातंय. पण तिनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सागरचे आयजी के. पी. खरे यांनी सांगितलंय. ते म्हणाले सासरची मंडळी आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली. 

तलावात उडी मारून आत्महत्या

आयजीनुसार अनामिकानं आपला नवरा आणि सासऱ्यांना कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. अनामिकाच्या वडीलांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे माहिती झालं की, तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. तसंच आयजी म्हणाले की, तिच्या मैत्रिणीकडून कळलं की तिच्या नवऱ्यासोबतही तिचे संबंध सामान्य नव्हते.

सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास सागर इथं पोलीस अॅकॅडमीमध्ये तलावात उडी मारून अनामिकानं आत्महत्या केली. अनामिका कुशवाहची निवड व्यापमं अंतर्गत झाली होती. त्यामुळं या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.