नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच सोमन गुप्ता बेवफा है हे नोटेवरील वाक्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतंय.
सगळीकडे या सोनम गुप्चाचीच चर्चा आहे. ही सोनम गुप्ता नक्की कोण आहे याची कोणालाच माहिती नाही. मात्र आता तर हद्दच झालीये. देशातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूट आयआयटीमधील परीक्षेत चक्क सोनम गुप्ताशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला.
सोशल मीडियावर व्हायरल झाली सोनम गुप्ताची बेवफाई
10 च्या जुन्या नोटांपासून 2000च्या नव्या नोटेवर सोनम गुप्ता बेवफा बेवफा है असं लिहिेलेलं पाहायला मिळतं. पण कोणालाही माहीत नाही की सोनम गुप्ता कोण आहे आणि ती का बेवफा आहे.
गुवाहाटी आयआयटीमध्ये हा प्रश्न विचारण्य़ात आला. आयआयटी गुवाहाटीच्या एका प्रोफेसरनी हा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना विचारला. हा प्रश्न प्रोबॅबलिटी या पेपरमधील होता. यानुसार गणिताच्या थेअरीने मुलांना प्रूव्ह करायचे होते की सोनम गुप्ता बेवफा का आहे.
असा होता प्रश्न
जर एखादी व्यक्ती x आहे आणि ती बेवफा आहे. तर काय probability आहे की सोनम गुप्ता बेवफा आहे. त्यासोबतच खाली थेअरी देण्यात आली होती ज्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवायचा होता.