www.24taas.com, पाटणा
कॉँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारमधून मुंबईला आल्याचे पुरावे दिले आहेत. यासाठी त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला. दिग्विजय सिंह म्हणाले की, राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर शिवसेना सरकारच्या कार्यकाळात विशेषांक प्रसिद्ध झाला होता.
यामध्ये ठाकरे कुटुंबाचा इतिहास आहे. विशेषांकातील पान क्रमांक 45 वर ठाकरे कुटुंब बिहारहून(मगध) भोपाळ व त्यानंतर चित्तोडगढमध्ये आल्याचे नमूद आहे. त्यानंतर ते पुण्यात आले. राज ठाकरे यांनी उलट बिहारी असल्याचा अभिमान बाळगायला हवा, असे दिग्विजय सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध देशाच्या विविध भागांत गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत राहणार्या बिहारी नागरिकांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बुधवारी बिहार, झारखंड व हरियाणामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.