नवी दिल्ली : तुम्ही जर सोने किंवा सोने नाणी खरेदी करम्याचा विचार करत असाल तर दिवाळीपर्यंत वाट पाहा. दिवाळीपर्यंत सोने प्रति तोळा २५,५०० रुपये इतके खाली येऊ शकते. याचे कारण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंमतीत मोठी घसरण झालेय. १८ वर्षांनंतर ही पाहायला मिळतेय. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोने दर घसरण्याची शक्यता अधिक आहे.
गेल्या चार दिवसांत सरापा बाजारात सोने ७५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरदिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दर घसरत आहे. सलग पाचव्या आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे. १९९७ नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे.
सराफा अभ्यासकांच्यामते यावर्षी सोने दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या दिवाळीत सोने दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने प्रति तोळा (१० ग्रॅम) २५,५०० रुपये खाली येईल.
गतवर्षी सोने दिवाळीत २७,००० रुपये प्रति तोळाच्या जवळपास होते. लग्न सराई कमी असल्याने यावर्षी सोन्याची मागणी कमी राहिली होती. गोल्डमॅन सॉक्सच्या अंदाजानुसार अमेरिकेत व्याज दर वाढले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १००० डॉलर प्रति औंस खाली जाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.