नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे चार जानेवारीला देशात पुन्हा एकदा निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम तयार झाला असून त्याची घोषणा ४ जानेवारीला करण्याची निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उत्तर प्रदेशमध्ये ७ फेब्रुवारीपासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
गोवा, पंजाब, उत्तराखंडात, मणिपूर एकाच टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुका ८ फेब्रुवारीला होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.