या पाच कारणांनी घसरले सोन्याचे दर, ग्राहकाने काय करावं?

सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पाच वर्षातील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरत २५ हजारांखाली उतरले. अशात कमोडिटी एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे की, ही घसरण मजबूत होणाऱ्या डॉलर इंडेक्समुळे आहे आणि आगामी काळ सोन्याच्या किमतीसाठी अधिक चांगली नाहीय.

Updated: Jul 20, 2015, 07:58 PM IST
या पाच कारणांनी घसरले सोन्याचे दर, ग्राहकाने काय करावं? title=

नवी दिल्ली: सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पाच वर्षातील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरत २५ हजारांखाली उतरले. अशात कमोडिटी एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे की, ही घसरण मजबूत होणाऱ्या डॉलर इंडेक्समुळे आहे आणि आगामी काळ सोन्याच्या किमतीसाठी अधिक चांगली नाहीय.

पाच कारणांमुळे घसरले सोन्याचे दर

१. शुक्रवारी चीनच्या शांघाय गोल्ड एक्सचेंज बाजारात ५ टन पेक्षा जास्त सोनं विकलं गेलं. ज्यामुळं सोन्याच्या दरात घसरण झाली.

२. शुक्रवारी अमेरिकेच्या फ्युचर्स कमिशनकडून दिल्या गेलेल्या आकड्यांनुसार १४ जुलैपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री झाली. ज्यामुळं सोन्याचे दर घसरले. 

३. ग्रीक संकटादरम्यान मजबूत झालेल्या डॉलर इंडेक्सनं पुन्हा ९८चा आकडा तोडला. त्याचा सरळ-सरळ परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय. एक्सपर्ट्सनुसार आगामी काळात सोन्याची किंमत आणखी घसरू शकते. 

४. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम भारतीय बाजारात पडला. सोमवारी घरगुती बाजारात सोन्याची किंमत २५ हजारांपेक्षा कमी झालीय.

५. अभ्यासकांनुसार १ ऑगस्टपासून प्रस्तावित गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम सुरू होते. तेव्हा बाजारात सोन्याचा स्टॉक वाढेल आणि सोन्याच्या किमतीत आणखी घसरण पाहायला मिळू शकते. 

ग्राहकांनी काय करावं...

जाणकारांच्या मते दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत २४ हजारांपर्यंत येऊ शकतात. त्यामुळं अजून सोनं खरेदी करण्यासाठी ते वाट पाहू शकतात. 

गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम

अर्थ मंत्रायलानं नवी गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमचा ड्राफ्ट जारी केलाय. ज्यानुसार कमीतकमी ३० ग्रामपर्यंतचं सोनं बँकेत जमा केलं जावू शकतं. खातेधारकाला सेव्हिंग अकाऊंट सारखं यावर व्याज मिळेल किंवा सोन्याच्याच रुपात आपण त्याचं वजन वाढवून घेऊ शकता. 

यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या स्कीमचा उल्लेख करत नवी स्कीम गोल्ड डिपॉझिटबद्दल सांगितलं होतं. आता १ ऑगस्टपासून ही स्कीम लागू होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.