'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं?

मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय. 

Updated: Jan 8, 2016, 02:29 PM IST
'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं? title=

नवी दिल्ली : मुस्लिम विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' शिकवलं म्हणून एका शिक्षकाला काही कट्टरपंथियांकडून मारहाण करण्यात आली. कोलकत्यात ही घटना घडल्याचं समोर आलंय. 

काझी मासूम अख्तर असं या मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे. कोलकत्याच्या तलपुकुरमधल्या एका मदरशात ते विद्यार्थ्यांना 'राष्ट्रगीत' म्हणायला शिकवत होतं. 

या घटनेनंतर मुस्लिम मुलांना 'राष्ट्रगीत' शिकवणं हे इस्लाम विरोधी कसं असू शकतं? असा प्रश्न समोर उभा राहतोय. यावरच झी न्यूजच्या 'ताल ठोक के' या कार्यक्रमात झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.