नवी दिल्ली : 10 रुपयांचे नाणे बंद होण्याची अफवा पसरविण्यात येत आहे. आधी फेसबूकच्या माध्यातून पोस्ट करुन ही अफवा पसरविली गेली. त्यानंतर व्हाट्सअॅपवरुन ही बंदची पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे कोणीही 10 रुपयांचे नाणे घेण्यास धजावत नव्हते.
दुकानदार, रिक्षावालेही 10 रुपयाचे क्वॉईन घेण्यास नकार देत होते. तर काही ग्राहकही 10 चे क्वॉईन घेण्यास नकार देत आहेत. काही जण सांगत आहेत, बाजारात बनावट 10 रुपयांचे नाणे आले आहे. त्यामुळे दिल्ली आणि मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी 10 चे क्वॉईन घेण्यास अनेक जण घाबरत होते.
मात्र, आरबीआय अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हे नाणे बंद केलेले नाही आणि करण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण दिलेय. जर कोणतीही बॅंक नकार देत असेल तर तुम्ही थेट आमच्याकडे तक्रार करा, असे आवाहन केले आहे.