नवी दिल्ली : 500 आणि 2000 रुपयांच्या नोट लवकरच व्यवहारात आणल्या जाणार आहेत. 500 रुपयाच्या नोटवर लाल किल्ल्याचा आणि 2000 रुपयाच्या नोटवर मंगल यानाचं चित्र असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, बुधवारी 9 नोव्हेंबरला सगळ्या बँका लोकांच्या कामकाजासाठी बंद असणार आहेत. दोन दिवस काही ठिकाणी एटीएम सुद्धा बंद असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रुपये आणि 1000 रुपयांची नोट बंद करत देशात खळबळ माजवली. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला चाप बसण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.