नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला.
१५ ऑक्टोबर १९३१ हा दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले. ते नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमले. त्यामुळे त्यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन घोषीत केला. त्या दिवसापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
आपल्या आयुष्यात कायम एक शिक्षक म्हणून मला ओळखले जावे अशी इच्छा डॉ. कलाम नेहमी बोलून दाखवयाचे.
त्यांना १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९० मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओमधील कामांबद्दल पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संरक्षण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि वैज्ञानिक संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना भारत रत्न पुरस्काराने १९९७ मध्ये सन्मानित करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.