वडोदरा : अभिनेत्री आणि काँग्रेस सदस्य नगमा आज वाढती असहिष्णुतावर आमिर खानच्या वक्तव्यावर समर्थन करण्यासाठी पुढे सरसावली. सुपरस्टारने भारत सोडण्याचा कधी विचार केलेला नाही. नगमाने योगी आदित्यनाथ या भाजप नेत्यांच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल करत समाचार घेतला.
आमिरच्या व्यक्तव्यानंतर असहिष्णुतावर इतका गोंधळ का. त्याच्यावर टीका करण्याचे कारण काय? त्याचे ते वैयक्तीक मत आहे. आमिरच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यानंतर नगमा म्हणाली, कोणता असा डोंगर देशावर कोसळलाय. (म्हणजे आमिरच्या वक्तव्यानंतर कोणी मोठी अशी समस्या उभी राहिली आहे.)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.