नवी दिल्ली : कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) एक मोठे पाऊल उचलले. त्यामुळे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. १ जानेवारी २०१६ पासून युनिव्हर्सल अकाऊंड नंबर (यूएएन) पीएफ खातेधारकांची ओळख होणार आहे.
१ जानेवारीपासून यूएएन नंबर शिवाय पीएफमध्ये पैसे भरणे शक्य होणार नाही. असे सांगितले जात आहे पीएफ नंबरच्या आधारावर पीएफ क्लेम केला जातो आणि पैसे काढले जात आहेत.
ईपीएफओनुसार पीएफ ऑफिस आता केवळ दावा करणाऱ्यांना यूएएन नबंर आवश्यक असणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे बॅंक खाते, आधारसहीत केवायसी अपडेट झालेले हवे.