महागाई चटका चिमुरड्यांनाही

डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे... स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे.

Updated: Sep 14, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, मुंबई
डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसपाठोपाठ आता स्कूलबसची भाडेवाढही होणार आहे... स्कूलबसचं भाडं ३० ते ३५ रूपयांनी वाढणार आहे.
१ ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ करण्यात येणार असल्याची माहिती स्कूल बस मालक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली आहे.
स्कूलबस या डिझेलवर चालतात. सरकारनं डिझेल दरवाढ केल्यानं ही भाडेवाढ अटळ असल्याचं गर्ग यांनी `झी २४ तास`शी बोलतांना सांगितलं.