www.24taas.com, कैरो
इजिप्तच्या अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत ‘मुस्लिम ब्रदरहूड’चे नेते महम्मद मोरसी यांना निसटता विजय लाभला. ते देशाचे पहिले बिगरलष्करी अध्यक्ष आहेत.
हुकूमशहा होस्नी मुबारक यांच्याविरोधातील जनआंदोलनानंतर इजिप्तमध्ये हे सत्तांतर झाले आहे. ६० वर्षांचे मोरसी यांनी माजी पंतप्रधान अहम्मद शफिक यांना पराभूत केले. मोरसी यांना ५१ टक्के तर शफिक यांना ४९ टक्के मते पडली.
मतमोजणी सुरू असताना निवडणुकीत आपलाच नेता विजयी झाल्याचे वृत्त दोन्ही गटांनी पसरविल्याने काही काळ तणावाचे वातावरणही पसरले होते. मोरसी हे देशाचे पाचवे अध्यक्ष आहेत.