वर्षाचा पहिला दिवस जगभराने आनंदाने साजरा केला आसला तरी, जपानमध्ये मात्र पुन्हा भुकंपाने नववर्षाचं आगमन झालं आहे. टोकयो आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता ७.० रिश्टर स्केल एवढी होती.
जपानच्या हवामान खात्याने सांगितलं की दुपारी २ वाजून २८ मिनीटांनी (स्थानिक वेळेनुसार १० वा. ५८ मिनीटांनी) हा धक्का बसला.
परंतु, यात सुनामीचा कुठलाही धोका नसल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी ११ मार्च रोजी जपानमध्ये झालेल्या भुकंपाबरोबरच सुनामीही आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तसंच जीवितहानीही झाली होती. याचबरोबर अणुभट्टींनाही धोका पोहोचून प्रचंड प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली होती.