पाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी

भारताने आपली ताकद दाखवून देताना नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर चीनने आगपाखड केली. आता आपणही मागे नसल्याचा प्रयत्न पाकने केला आहे. पाकिस्तानने आज बुधवारी अण्वस्त्रधारी 'शाहिन-१ए' ( हत्फ-४) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

Updated: Apr 25, 2012, 12:58 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद 

भारताने आपली ताकद दाखवून देताना नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर चीनने आगपाखड केली. आता आपणही मागे नसल्याचा प्रयत्न पाकने केला आहे.  पाकिस्तानने आज बुधवारी अण्वस्त्रधारी 'शाहिन-१ए'  ( हत्फ-४) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

भारताने 'अग्नि-५' या पाच हजार किमी क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर आठवड्यातच पाकिस्तानने ही चाचणी घेतली आहे. मात्र, या क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता पाकिस्तान लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारताने  आपली ताकद दाखविल्याने पाकिस्तानमध्ये हा खटोटोप केल्याचे दिसून येत आहे. हिंदी महासागरात पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.

'शाहिन-१' या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक यंत्रणा वापरून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आल्याचे, लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी शाहिन-१ची मारा करण्याची क्षमता ७५० किमी होती. मात्र, 'शाहिन-१ए' (( हत्फ-४) याची स्पष्ट करण्यात आलेली नाही. या क्षेपणास्त्राची क्षमताही ७५० किमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारताच्या अग्नि-५ ची क्षमता ५,००० किमी आहे.