भारतीयाने शोधलं फुप्फुसविकारावरील औषध

सिस्टिक फायबरोसिस या फुप्फुसांच्या विकारावर इलाज शोधण्यात आला असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी केला आहे. आणि हा इलाज शोधून काढणारी व्यक्ती भारतीय आहे.

Updated: Apr 10, 2012, 12:08 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन

सिस्टिक फायबरोसिस या फुप्फुसांच्या विकारावर इलाज शोधण्यात आला असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांनी केला आहे. आणि हा इलाज शोधून काढणारी व्यक्ती भारतीय आहे.

मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील जयराज राजगोपाळ आणि त्यांच्या काही सहाय्यकांनी सिस्टिक फायबरोसिसवरील औषधाचा शोध लावला आहे. त्वचेवरील पेशींमधून त्यांनी नव्या प्रकारच्या पेशी विकसित केल्या. या पेशी प्रयोगशाळेत निर्माण केल्या जाऊ शकतात.

सिस्टिक फायबरोसिसवरील औषधं बनवण्यासाठी या प्रकारच्या अनेक पेशींची गरज पडते, असं हे औषध बनवणाऱ्या पथकातील एका सदस्याने सांगितलं आहे. हे तंत्र शोधून काढणाऱ्या राजगोपाळ यांनी या औषधावर अजून संशोधन करणार असल्याचं सांगितलं आहे.