www.24taas.com, वृत्तसंस्था, सेवूल, दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग हाँग वोन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 11 दिवसांपूर्वी फेरी बोटला झालेल्या अपघाताची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिलाय. या अपघातात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
जलसमाधी मिळालेल्या या फेरी बोटीतून आतापर्यंत 187 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत तर 115 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे. गेल्या शनिवारी खराब हवामान आणि समुद्राच्या उसळत्या लाटांमुळं बोट पलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. गाठवणाऱ्या समुद्राच्या पाण्यात बोट पलटल्यानं मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
450 प्रवाशांसह हे जहाज जेजू रिसॉर्टकडे जात होते. या जहाजात दक्षिण सोलमधील 325 विद्यार्थी होते. तर अन्य जाहाजाचा कर्मचारी वर्ग होता. पहिल्या दिवशीत जहाजातील 161 जणांना वाचवण्यात यश आलं होतं.
मृत्यूंमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अजूनही समुद्रात मृत आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळाली नसल्यानं यावर दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी आज राजीनामा दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.