तोरेझ (युक्रेन) : मलेशिया एअरलाइन्सचे बोईंग ७७७ हे विमान युक्रेनमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात रशियाच्या सीमेजवळ झाल्याची बातमी इंटरफॅक्सने दिले असून या विमानात २८० प्रवासी होते. दरम्यान, विमान हे मिसाइलने पाडले असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
अँमस्टरडॅमहून- क्वालालंपूरला जाणारे हे बोइंग विमान रशियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ५० मैलावर कोसळले. या विमानाला आग लागली आणि ते कोसळ्याची माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण तोरेझ येथील डोनत्सेक भागात हे विमान कोसळ्याचे युक्रेनच्या लष्कराच्या सूत्रांनी सांगितल्याचे युक्रेनच्या एका पत्रकाराने सांगितले.
या भागात रशियाला समर्थन करणाऱ्या अलगाववाद्यांचे वर्चस्व आहेत. ते युक्रेनच्या लष्कराची नेहमी संघर्ष करीत असतात. हे विमान कोसळल्याचा व्हिडिओ युक्रेनच्या एका कार्यकर्त्याने शूट केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.