अमेरिकेतल्या मराठीजणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना अमेरिकेतल्या मराठी माणसांनी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Updated: Jul 4, 2015, 08:15 PM IST
अमेरिकेतल्या मराठीजणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन title=

लॉस एन्जेलिस : महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना अमेरिकेतल्या मराठी माणसांनी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

लॉस एन्जेलिसमध्ये आयोजित करण्यात १७ व्या बृहद्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात मुख्यंमत्री बोलत होते. अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे महाराष्ट्र परिचय केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याल्या मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेट्ये, विवेक रणदिवे आदी उपस्थित होते. 

अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपलं मराठीपण निष्ठनं जोपासलंय, ही बाब अभिमानास्पद आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय. 

'मेक इन महाराष्ट्र' हा आमचा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे.  यासोबतच बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि प्रस्तावित महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यटनासाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ टक्के सवलत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी घोषीत केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.