सलग ४६ तास वाढदिवसाचा आनंद, गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद

जर्मन व्यक्तीने आपला वाढदिवस ४६ तास साजरा केला. हा साजरा होणारा वाढदिवस जगातील सर्वाधिक काळ असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Reuters | Updated: Aug 20, 2015, 01:50 PM IST
सलग ४६ तास वाढदिवसाचा आनंद, गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद title=

बर्लिन : जर्मन व्यक्तीने आपला वाढदिवस ४६ तास साजरा केला. हा साजरा होणारा वाढदिवस जगातील सर्वाधिक काळ असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
  
स्टीव्ह हॅग्मेईर, असे या अवलियाचे नाव आहे. त्यांनी सलग ४६ तास स्वत:च्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचवेळी त्यांनी स्टीव्ह यांनी विमानातून विविध देशांमध्ये प्रवास करत आपल्या वाढदिवसाचा आनंद लुटला. गेल्यावर्षी ४ ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसाच्यावेळी स्वेग यांनी हा विक्रम केला होता. 

स्टीव्ह यांनी न्यूझीलंडमधील ऑकलंडमधून प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन, हवाईतील होनालुलू  दरम्यान प्रवास करत त्यांनी या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी कराचीतील नर्गिस भीमजी यांच्या नावावर सर्वाधिक काळ वाढदिवस साजरा करण्याचा विक्रम होता. मात्र, स्टीव्ह यांनी आता तो मोडीत काढलाय. 

नर्गीस भीमजी यांनी १९९८मध्ये ३५ तास २५ मिनिटे इतका वेळ स्वत:चा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी नर्गीस भीमजी यांनी कराची, सिंगापूर आणि सॅनफ्रान्सिस्को असा प्रवास केला होता.

स्टीव्ह यांचा गेल्यावर्षीचा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा झाला असला तरी, त्यांनी यंदाचा वाढदिवस आपल्या कुटुंबाबरोबरच साध्या पद्धतीने साजरा केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.