उधमपूर : भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ल्यानंतर येथे पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नवेद याने म्हटले आहे की, असे हल्ले करण्यात मजा येते.
पाकिस्तानमधून आलेला संशयीत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद नवेदने स्वत:ला पाकिस्तानमधील फैसलाबाद असल्याचा दावा केलाय. मोमिन खान याच्याबरोबर १२ दिवसांपूर्वी जम्मू परिसरात आल्याचे सांगितले. खान हा भारतीय जवानांच्या गोळीबारात खान मारला गेला.
अजमल कसाब याच्यानंतर मोहम्मद नवेद याला जिवंत पकडले आहे. कसाबला २००८ मध्ये मुंबई आतंगवादी हल्ल्याच्यावेळी पकडले होते. नवेदने म्हटले, भारतीयांना मारण्यासाठी आलो होतो. मला येथे येऊन १२ दिवस झालेत. एतके दिवस आम्ही जंगलात फिरत होतो. मी पाकिस्तानमधून आलो आहोत. माझा सहकारी गोळीबारात मारला गेला मात्र, मी वाचलो. मी मारला गेलो असतो तर हा अल्लाचा निर्णय होता. हे सर्व करण्यास मला मजा येते, असे तो म्हणाला.
तो आधी म्हणाला माझे वय २० वर्षांपर्यंत आहे. मात्र, त्यानंतर मी केवळ १६ वर्षांचा आहे, असे सांगितले. सुरुवातीला आपली ओळख कासिम अशी सांगितलललली. त्यानंतर उस्मान असे आपले नाव सांगितले. लश्कर-ए-तैयबा यांच्या फरमानानुसार जम्मू-काश्मीरमध्ये पाठविले. जर पकडले गेले तर १८ वर्षांपेक्षा कमी वय सांग. कारण बाल कायद्यानुसार खटला दाखल होईल, असे तो म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.