www.24taas.com,लंडन
आपली पृथ्वी २१ डिसेंबरला नष्ट होण्याचं भाकीत करण्यात आल्याने दहशत निर्माण झाली आहे. जगातील अनेक देश या भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.
२१ डिसेंबर रोजी पृथ्वी नष्ट होणार आहे, असं भाकित करण्यात आलंय. त्यामुळे रशिया, फ्रान्स, युक्रेन, मेक्सिको आदी देश भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. येथील लोकांनी वाचण्यासाठी शोधून काढलेल्या युक्तीमुळे प्रशासन हतबल झाले आहे.
एका नव्या सर्व्हेनुसार २१ डिसेंबरला पृथ्वी नष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. हा सर्व्हे अमेरिकेत करण्यात आला. अडीच कोटी अमेरिकन जनतेने म्हटले आहे की, पृथ्वी नष्ट होणार आहे. दरम्यान, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांच्यामते ही अफवा आहे.
व्यावसायिक ज्योतिष यांनी २१ डिसेंबरला पृथ्वी नष्ट होण्याची भविष्यवाणी व्यक्त केली. Nostradamus यांनी केलेली १० भविष्य खरी ठरल्याचे सांगितले आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवून ही भविष्यवाणी केल्याचे म्हटले जाते आहे. मात्र, असे असले तरी अमेरिकन अवकाश संशोधन करणाऱ्या नासाने म्हटले आहे की, हे सर्व खोटे आहे. जगबुडीची अफवा पसरवण्यात आलीय. त्याला वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत.
जगबुडी होण्याची धास्तीने अनेकांनी मंदिरांचा आसरा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. अशीच काहीशी वेगळी परिस्थिती रशियात दिसून येत आहे. येथील अनेक लोक भीतीमध्ये वावरत आहेत. तर काहींनी जमिनीमध्ये खंदक खोदून अनेक महिन्यांचे अन्न, धान्य साठवून ठेवले आहे. त्यामुळे येथील लोक किती भीतीच्या छायेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.